२०२४ या वर्षातील शेवटचा म्हणजेच डिसेम्बर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु असून येत्या ५-६ दिवसात आपण नववर्षात पदार्पण करणार असून या नवीन वर्षात काही नियमांमध्ये बदल होणार आहेत.
१ जानेवारी २०२५ पासून होणाऱ्या बदलांबद्दल जाणून घ्या.
- पहिला सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे टेलिकॉम कंपन्यांसाठी होय. १ जानेवारी २०२५ पासून टेलिकॉम कंपन्यांना राइटऑफ वे रुल लागू होणार आहे. या नव्या नियमानुसार कंपन्यांना ऑप्टिकल फायबल लाइन आणि नवे मोबाईल टॉवर लावण्यावर फोकस करावा लागणारआहे. यामुळे कंपन्यांना अधिक चांगली सेवा देण्यास मदत होणार आहे. नव्या नियमानुसार टेलिकॉम कंपन्यांना मोबाईल टॉवर लावण्यासाठी फार अडचणी येणार नाहीत. नवे नियम लोकांचा तसेच कंपन्यांचा विचार करून करण्यात आले आहेत.
- वस्तू आणि सेवा कर नेटवर्कच्या जीएसटी पोर्टलवर ३ महत्त्वाचे बदल करण्याची घोषणा केली आहे. हे सर्व बदल १ जानेवारी २०२५ पासून लागू होतील. यातील दोन बदलहे ई-वे बिल करण्याची वेळ आणि त्याच्या मुदती संदर्भात आहे. तर तिसर बदल हा जीएसटी पोर्टलच्या सुरक्षिततेसंदर्भातील आहे. या गोष्टीचे पालन केले नाही तर खरेदीदार, विक्रेता सर्वांचे नुकसान होऊ शकते.
- अमेझॉनने भारतातील प्राइम मेंबरशिपच्या नियमात १ जानेवारी २०२५ पासून बदल करण्याचे जाहीर केले आहे. नव्या वर्षात एका अकाऊंटवरून फक्त दोन टीव्हीवर प्राइम व्हिडिओ स्ट्रीम होऊ शकतील. जर एखादा युझर टीव्हीवरून प्राइम व्हिडिओ दोन पेक्षा अधिक टीव्हीवर पाहत असेल तर त्याला नवे सबस्क्रिप्शन घ्यावे लागले. सध्या प्राइम मेंबर असलेल्या व्यक्तीला पाच डिव्हाइसवर व्हिडिओ पाहता येतात. यात डिव्हाइसच्या प्रकारावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नव्हत
- RBIने NBFC आणि HFCसह एफडी संदर्भातील नियमात बदल केले आहेत. हे नियम देखील १ जानेवारी २०२५ पासून लागू होतील. नव्या नियमानुसार डिपॉझिट घेणे, लोकांच्या डिपॉझिटचे विमा करने, आणिबाणीच्या काळात डिपॉझिट परत करणे आदी गोष्टींचा समावेश आहे.
- तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेतात. गेल्या ५ महिन्यांपासून १९ किलो सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. तर प्रत्येक घरात वापरल्या जाणाऱ्या १४.२३ किलो सिलिंडरच्या किमतीत अनेक महिन्यांपासून वाढ झालेली नाही. वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ होणार की कपात हे समजू शकेल.
- नव्या वर्षात गाडी घेणे महाग होणार आहे. अनेक कार कंपन्यांनी महागाईचे कारत देत १ जानेवारी २०२५ पासून गाड्यांच्या किंमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. ज्यात मारुती सुझुकी, हुंडई, महिंद्रा, जेएसडब्ल्यू एमजी, होंडा, मर्सिडीज- बेंझ, ऑडी, बीएमडब्ल्यू सारख्या गाड्यांचा समावेश होता. अधिक तर कंपन्यांनी गाड्यांच्या किंमतींत ३ टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली आहे.