धक्कादायक : परप्रांतीय सुरक्षारक्षाकडून मराठी महिलेला बेदम मारहाण , 'हे' कारण आले समोर
धक्कादायक : परप्रांतीय सुरक्षारक्षाकडून मराठी महिलेला बेदम मारहाण , 'हे' कारण आले समोर
img
Dipali Ghadwaje
ठाण्यातून  एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील विवियाना मॉल परिसरातील ही घटना आहे. विविआना मॉलमधील परप्रांतीय सुरक्षा रक्षकाकडून महिला रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , ठाण्यातील विविआना मॉलमधील परप्रांतीय सुरक्षा रक्षकाने महिला रिक्षा चालकाला मारहाण केली आहे. मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाचं भाडं नाकारल्याच्या वादतून ही मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे.

मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकानं या महिला रिक्षाचालकाकडे भाड्या बाबत विचारणा केली, मात्र या महिलेनं त्यांना आपल्या रिक्षातील गॅस संपला आहे, असं सांगितलं. त्यानंतर यावरून महिला रिक्षा चालक आणि या मॉलचा सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये वाद झाला. सुरक्षा रक्षकाने अरेरावीची भाषा केल्यामुळे महिला रिक्षा चालक त्याच्या अंगावर धावून गेली, त्यानंतर या सुरक्षा रक्षकाने महिलेला मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group