मुंबईत एनसीबीने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे . एनसीबीने तब्बल ५ कोटी २० लाखांचे ड्रग्स जप्त केले आहे. दोन कारवाईत हे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , मुंबईतल्या एका फ्लॅटमध्ये गांजाची झाडे उगवून त्यातून त्याची तस्करी होत असल्याचेही समोर आले होते. एनसीबीला डार्क वेबच्या माध्यमतून ही गांजा तस्करी होत असल्याचे समजले. त्यानंतर एनसीबीने छापा टाकून मुंबईतून आरोपीला अटक केली आहे.
काय असते डार्क वेब
डार्क वेब ओनियन राउटिंग तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानामुळे युजरजी गोपनीयता कायम ठेवली जाते. या तंत्राचे वापर करणाऱ्या युजरला ट्रॅक करता येत नाही. डार्क वेब अनेक आयपी ऍड्रेसमधून कनेक्ट आणि डिस्कनेक्ट होते, ज्यामुळे ट्रॅक करणे अशक्य होते. बिटकॉइन सारख्या आभासी चलनाचा वापर डार्क वेबवर व्यवहार करण्यासाठी केला जातो.
एनसीबीने दुसऱ्या कारवाईत मुंबई विमानतळावर थायलंडमधून भारतात येणारे ड्रग्स पकडले. या तस्करीत मोठे रॅकेट असल्याचे उघडकीस आले आहे.
थायलंडमधून बँकॉक आणि नंतर मुंबईत आलेले ड्रग्सचे पार्सल एनसीबीने पकडले आहे. त्यातून १३ किलो हायब्रिड स्ट्रेन गांजा सापडला आहे. या गांजाची तस्करी करण्यात कोल्हापूरची एक व्यक्ती असल्याचे समोर आले. त्या संशयित व्यक्तीला एनसीबीने अटक केली आहे. दोन वेगवेगळ्या कारवाईत १५ कोटी २० लाखांचे ड्रग्स जप्त झाले.