धक्कादायक ! तिसरी मुलगीच झाली म्हणून पत्नीला जिवंत जाळलं
धक्कादायक ! तिसरी मुलगीच झाली म्हणून पत्नीला जिवंत जाळलं
img
दैनिक भ्रमर
परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर घटना आली आहे. या घटनेनं संपूर्ण राज्यात एकच खळबळ निर्माण झाली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला तिसरीही मुलगीच झाली म्हणून चक्क पत्नीला जिवंत जाळण्याची  अतिशय धक्कादायक घटना घडली घडली आहे. 

मिळालेल्या  माहितीनुसार, तिसऱ्यांदाही मुलगीच झाली. तेव्हापासून या पती पत्नीमध्ये वारंवार भांडणं व्हायची. 26 डिसेंबरला रात्रीही दोघांमध्ये याच विषयावरुन भांडण सुरू झालं. संतापलेल्या पतीनं पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि काडी पेटवली. बघता बघता पत्नीसह घरानंही पेट घेतला. एवढाश्या पत्र्याच्या खोपट्यातून पेटलेली ही महिला मदतीसाठी रस्त्यावर सैरावैरा पळू लागील. आणि पळत शेजारच्या दुकानात पोहोचली.  

दरम्यान,  महिलेला बघून आजूबाजूच्या लोकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. मात्र तोवर ही महिला गंभीररित्या भाजली होती. ती बेशुद्ध पडली. या सगळ्या आगीत दोन दुकानंही जळाली. गंभीर भाजलेल्या महिलेला स्थानिकांनी तातडीनं रुग्णालयात नेलं. मात्र महिलेचा मृत्यू झालेला होता. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group