धक्कादायक  ! शिक्षिकेकडून  दहावीत शिकणाऱ्या  विद्यार्थ्यावर लैंगिक  अत्याचार
धक्कादायक ! शिक्षिकेकडून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार
img
दैनिक भ्रमर
राज्यात महिलांसोबतच आता पुरुषांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणवीर आला आहेकी काय असा प्रश पडेल अशीच एक धकाकदायक घटना उघडकीस आली आहे. शाळेत संस्काराचे धडे दिल्या जाणाऱ्या आणि सर्वात जास्त सुरक्षित वाटणाऱ्या शिक्षकांकडूनच जर असे गुन्हे घडत असतील तर पालक कोणावर विश्वास ठेवतील.   पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका शिक्षिकेनं दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे. शाळेत परीक्षेसाठी विद्यार्थी आल्यानंतर महिला शिक्षिकेनं विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. 

याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एका महिला शिक्षिकेनं अशाप्रकारे विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने शाळा प्रशासनात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत दहावीच्या वर्गात शिकतो. तर आरोपी शिक्षिका याच शाळेत शिकवायला आहे. घटनेच्या दिवशी पीडित विद्यार्थी शाळेत दहावीची पूर्व परीक्षा द्यायला आला होता. मुलगा शाळेत आल्यानंतर त्याची जबाबदारी शिक्षकांवर असते.

पण शिक्षिकेने मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शाळेच्या आवारात त्याच्यावर अत्याचार केल्याची अशी फिर्याद शाळेच्या मुख्याध्यापिकेनं दिली. पीडित मुलाच्या आईने शाळेच्या प्रशासनाकडे याबाबतची तक्रार दिली होती. त्यानंतर मुख्याध्यापिकेने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तोंडे तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group