राज्यात गुन्हेगारीचे सत्र थांबता थांबत नाहीय अशातच रविवारी नागपूरमध्ये दिवसाढवळ्या एकाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर अली आहे. दुपारी दोन वाजाताच्या सुमारास एका तरुणाने ख्रिश्चन स्मशानाच्या चौकीदारावर चाकूचे वार करत त्याची हत्या केली आहे . या घटनेने नागपूर शहरासह परिसरात भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , ही घटना जरीपटका ख्रिश्चन दफनभूमीत येथे घडली असून रमेश शेंडे असं खून झालेल्या चौकीदाराचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहोचत आरोपीला ताब्यात घेतले असून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय
नक्की झाले काय?
रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक युवक हातात चाकू घेऊन जरीपटक्यातील ‘भारतीय प्रोटेस्टंट ख्रिचन कब्रस्थान’ येथे आला. तेथील चौकीदार रमेश शेंडे याच्या दिशेने धावत गेला. त्याचा हात पकडून काहीतरी विचारणा केली. त्यानंतर चाकूने रमेश यांच्यावर वार केले. त्यावेळी तेथे अंत्यविधीसाठी आलेला युवक जेकब किरण यांनी धावत जाऊन त्या युवकाला पकडले. तोपर्यंत रमेश शेंडे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
काही नागरिकांनी रमेश यांना रुग्णालयात पोहचवले तर आरोपीला किरण यांनी घट्ट पकडून ठेवले. आरोपी पळून जाण्यासाठी झटापट करीत असतानाच किरण यांनी जरीपटका पोलिसांना फोन केला. हत्याकांडाबाबत माहिती दिली. काही वेळातच जरपीटकचे पोलीस निरीक्षक संजय सिंग तेथे पोहचले. त्यांनी लगेच आरोपीला ताब्यात घेतले. घटनास्थळी पंचनामा करुन हत्येचा गुन्हा दाखल केला.