मोठी दुर्घटना : लक्झरी बसचा अपघात ; महिला ठार , १५ प्रवासी जखमी
मोठी दुर्घटना : लक्झरी बसचा अपघात ; महिला ठार , १५ प्रवासी जखमी
img
Dipali Ghadwaje
जळगावमध्ये लक्झरी बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघतामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून या अपघातात अनेक जण जखमी झाले आहे.

जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ बसला भीषण अपघात झाला आहे. बस थेट रस्त्यावरच आडवी झाली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर १५ प्रवासी जखमी झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार , जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ बसला भीषण अपघात झाला. बस थेट रस्त्यावरच आडवी झाली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर १५ प्रवासी जखमी झाले आहे. ही लक्झरी बस गुजरातवरून अकोल्याच्या दिशेने जात होती. ही बस प्रवाशांनी  भरलेली होती. अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या मधोमध पलटी झाली. 

चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने डिव्हायडर ओलांडून ही लक्झरी बस दुसऱ्या दिशेला पलटी झाला.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य केले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group