जेजुरीला देवदर्शनासाठी चाललेल्या वाहनाचा अपघात ; दोघांचा मृत्यू तर १४ जण जखमी
जेजुरीला देवदर्शनासाठी चाललेल्या वाहनाचा अपघात ; दोघांचा मृत्यू तर १४ जण जखमी
img
Dipali Ghadwaje
जेजुरी गडावर भाविकांची दर्शनासाठी बाराही महिने रेलचेल सुरू असते. मात्र सध्या  सोमवती यात्रेनिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. अशातच जेजुरी दर्शनासाठी येणार्‍या भाविकांचा बेलसर वाघापूर रस्त्यावर पिकअप ट्रक आणि आयशर गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, १४ जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

पिकअप ट्रकमधील भाविक दर्शनासाठी जात होते. मात्र, रस्त्यावर त्यांचा अपघात झाला. सध्या जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार ,  सोमवारी ३० डिसेंबरला बेलसर वाघापूर रस्त्यावर पहाटे अडीच वाजता दोन वाहनांचा अपघात घडलाय. पिकअप ट्रक आणि आयशर गाडीचा अपघात घडला असून, या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १४ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

सोमवती यात्रेनिमित्त प्रवासी जरेवाडी येथून सर्व भाविक जेजुरीला, खंडोबा देवाच्या देवदर्शनासाठी निघाले होते. मात्र, प्रवास करीत असतानाच पिकअप ट्रक आणि आयशर गाडीची एकमेकांना धडक बसली. हा अपघात पहाटे अडीच वाजता घडला. या अपघातात पिकअप गाडीतील जितेंद्र तोतरे आणि आशाबाई जरे या दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर, १४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त व्यक्तींवर जेजुरी येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून, जखमी झालेल्या व्यक्तींच्या हाता - पायांना मोठी दुखापत झाली असल्याची माहिती आहे. हा अपघात घडल्यानंतर जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, जेजुरी पोलीस या अपघाताचा सखोल तपास करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group