सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता "या" बँकेतून , कॅबिनेट बैठकीत सरकारचा मोठा निर्णय
img
Dipali Ghadwaje
राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. आता कर्मचाऱ्यांचा पगार भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेत जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा होणार आहेत. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकले होते त्या कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा याच बँकेतून मिळणार आहेत.

याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, यात कर्मचाऱ्यांच्या पगाराविषयी निर्णय घेण्यात आला.

शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणूकीसाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते उघडण्यास सरकारने परवानगी  दिलीय.

सन २०२४-२०२५ या वर्षासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना बँक खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली.

तसेच निवृत्तीवेतनधारकांची वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता तसेच शासनाच्या सार्वजनिक उपक्रम , महामंडळे यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणूकीकरीता बँकेस प्राधिकृत करण्यास देखील बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group