मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्या शोधासाठी सात पदके विविध राज्यासह देशभर रवाना झाली आहेत. सराईत गुन्हेगार असल्याने एक वेळ तो नेपाळलाही गेल्याची हिस्ट्री समोर आली आहे.
नेपाळमध्ये त्याचं शेवटचे लोकेशन स्ट्रेस झाल्याचे तपासात समोर आलेय. सुदर्शन देश सोडून गेला आहे का? याचा तपासही सीआयडी करत असल्याची माहिती समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले यांच्या शोधासाठी सीआयडीने 7 पथके विविध राज्यासह देशभर रवाना केली आहेत.
या अगोदर सुदर्शन घुले हा अनेक गुन्ह्यामध्ये आरोपी आहे. तसेच एका गुन्हा संदर्भात फरार असताना तो नेपाळला गेल्याचे देखील माहिती आहे. त्यामुळे पुन्हा तो नेपाळला जाऊ शकतो का? या संदर्भात सीआयडीला संशय आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देखील सीआयडी तपास करत आहे. फरार असलेले तीन आरोपी यांना अटक करण्याच्या दृष्टिकोनातून सीआयडीने आता तपासाचा फास आवळला आहे.