धक्कादायक : तरुणाच्या डोक्यात झाडली गोळी जागीच मृत्यू ; कुठे घडली घटना ?
धक्कादायक : तरुणाच्या डोक्यात झाडली गोळी जागीच मृत्यू ; कुठे घडली घटना ?
img
Dipali Ghadwaje
नवी मुंबईमध्ये गोळीबाराची घटना ताजी असताना आता मुंबई जवळील मीरा रोडमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मिरा रोड परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , मारेकऱ्यांनी या तरुणाच्या डोक्यातच गोळी झाडली आहे. मीरारोडचा शांती शॉपिंग सेंटरमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मोहम्मद तबरेज अन्सारी (वय 35) असं मृत तरुणाचं नाव आहे.  मीरारोडच्या शांती शॉपिंग सेंटरमध्ये ३५ वर्षीय शम्स तमरेज अन्सारी उर्फ सोनूचं चष्म्याचं दुकान आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजता दुकाना बाहेर उभा असताना एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर बेछूट गोळीबार केला. ह्यात मोहम्मदचा जागीच मृत्यू झाला आहे.

एका गुन्ह्यात मोहम्मद हा साक्षीदार असल्याने त्याला मागच्या काही दिवसांपासून धमक्या येत होत्या. पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अन्सारी साक्षीदार असल्याच्या कारणाने त्याला धमक्या येत होत्या. ह्याच कारणास्तव त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
 
अधिक माहिती अशी की, शम्स तमरेज अन्सारी उर्फ सोनू एका गुन्ह्यात साक्षीदार होता, यामुळे त्याला काही दिवसांपासून धमक्या मिळत होत्या. या धमक्यांबाबत अन्सारीने पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली होती. मात्र,आज रात्री अज्ञात हल्लेखोराने शॉपिंग सेंटरमध्ये अन्सारीच्या डोक्यात गोळी झाडली.

हत्या घडल्यानंतर नयानगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची तपासणी करण्यात येत असून, हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा केले जात आहेत. या घटनेमुळे शांती शॉपिंग सेंटर आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.  या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group