क्रूरतेचा कळस !
क्रूरतेचा कळस ! ".... म्हणून 5 वर्षांच्या मुलीस केली मारहाण अन् पक्कडने चटकेही दिले" , नेमकं काय घडलं ?
img
Dipali Ghadwaje
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. क्रूरतेचा कळस गाठणारी भयानक घटना मुंबईत घडली आहे. गोवंडी येथे एका महिलेने शेजारी राहणाऱ्या अवघ्या 5 वर्षांच्या मुलीला पकडून तिला बेदम मारहाण केली, एवढंच नव्हे तर पक्कड गरम करून तिच्या पायाला चटकेही दिल्याचा क्रूक प्रकार समोर आला आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार ,घरात पाळलेले मांजर लपवून ठेवलं म्हणून ती महिला त्या मुलीवर भडकली आणि त्या छोट्याश्या चुकीसाठी तिने त्या मुलीला बेदम चोप देत अमानुषपणे पायाला चटकेही दिल्याची भयाक घटना गोवंडीच्या शिवाजीनगर येथे घडली आहे. 

याप्रकरणी सोहेल मोहम्मद तालीम शेख यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली असून त्यानंतर पोलिसांनी निषाद मोहम्मद उमर शेख (38) या महिलेला अटक केली. दरम्यान या घटनेत मुलगी बरीच जखमी झाली असून तिच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार करण्यात आले व त्यानंतर तिला घरी पाठवण्यात आले.

 

इतर बातम्या
Join Whatsapp Group