नवीन वर्षांचं सेलिब्रेशन जीवावर बेतलं, फोन उचलला नाही म्हणून तरुणीचा बॉयफ्रेंडवर चाकूने हल्ला
नवीन वर्षांचं सेलिब्रेशन जीवावर बेतलं, फोन उचलला नाही म्हणून तरुणीचा बॉयफ्रेंडवर चाकूने हल्ला
img
दैनिक भ्रमर
गुन्हेगारीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून. आजकल कोणाला कोणत्या गोष्टीचा राहू येईल  काय घडेल याचा काही नेमच नाही. अशीच एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे.  नवीन वर्षाची पार्टी करणाऱ्या एका युवकाला त्याच्या गर्लफ्रेंडने चाकूने भोसकलं आहे. बॉयफ्रेंड फोन उचलत नव्हता म्हणून चिडलेल्या गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडवर हल्ला केला आहे. गर्लफ्रेंडने केलेल्या या हल्ल्यानंतर बॉयफ्रेंड गंभीर जखमी झाला आहे. सध्या तरुण आयसीयूमध्ये असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

कर्नाटकच्या हसनमध्ये ही घटना घडली आहे. मनुकुमार आणि भवानी हे एकमेकांना शाळेपासून ओळखत होते, पण 31 डिसेंबरला मनुकुमार भवानीचा फोन उचलत नव्हता. मनुकुमार मित्रांसोबत अशोका हॉटेलमध्ये असल्याचं भवानीला कळालं. मनुकुमार जसा हॉटेलमधून बाहेर आला, तसं भवानीने रात्री 12.30 वाजता त्याच्यावर चाकूने हल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, मनुकुमार हा गुड्डानहाली गावाचा रहिवासी आहे. मनुकुमार आणि भवानी शाळेपासून एकमेकांचे मित्र आहेत. काही काळानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं, पण मागच्या काहीदिवसांपासून मनुकुमार आणि भवानी वेगळे झाले. मनुकुमारचं हार्डवेअर शॉप आहे. मनुकुमार हॉटेलमध्ये मित्रांसोबत नव्या वर्षाची पार्टी करत होता. पार्टी सुरू असताना मनुकुमारने फोन उचलला नाही, त्यानंतर भवानी संतापली, यावरून दोघांमध्येही कडाक्याचं भांडण झालं आणि तिने मनुकुमारवर चाकूने हल्ला केला.

भवानीने हल्ला केल्यानंतर मनुकुमारच्या मित्रांनी त्याला हसन इन्सटिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या रुग्णालयात नेलं. सध्या मनुकुमारवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. केआर पुरम पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मनुकुमारच्या मित्रांचा जबाब नोंदवला आहे, तसंच पुढील तपास सुरू आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group