मुलीशी बोलतो म्हणून युवकाची हत्या, तरुणीच्या वडील आणि भावाने केला कांड !
मुलीशी बोलतो म्हणून युवकाची हत्या, तरुणीच्या वडील आणि भावाने केला कांड !
img
दैनिक भ्रमर
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलीशी बोलतो म्हणून पुण्यातील एका तरुणीच्या वडील आणि भावाने एका तरुणाची निघृण हत्या केली. 

 17 वर्षांच्या मुलीचे वडील, तिचा भाऊ आणि आणखी एकाने या तरुणाची हत्या केली आहे. या तिघांनी मिळून अल्पवयीन मुलाला लाथा-बुक्क्यांनी मारलं तसंच त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. पुण्याच्या वाघोलीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. गणेश वाघू धांडे असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. 17 वर्षांचा गणेश वाघोलीच्या वाघेश्वर नगरमध्ये गोरे वस्तीमध्ये राहत होता.

या प्रकरणी वाघोली पोलिसांनी नितीन पेटकर (वय 31), सुधीर पेटकर (वय 32) आणि लक्ष्मण पेटकर (वय 60) या तिघांना अटक केली आहे. हे तिघंही गणेश राहतो त्याच वाघेश्वर नगरच्या गोरे वस्तीमध्ये राहतात. मृत गणेश याचे वडील वाघू मारुती धांडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. 2 जानेवारीला रात्री 12.30 वाजता पेटकरच्या घरासमोर गोरे वस्ती भागात या तिघांनी गणेशवर हल्ला केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 जानेवारीला गणे मोटरसायकलवरून त्याच्या मित्रांसोबत घरी येत होता, त्यावेळी पेटकरने गणेशला अडवलं. मुलीशी का बोलतो म्हणून गणेशला पेटकरने शिव्या दिल्या आणि मारहाण करायला सुरूवात केली. यानंतर पेटकर, त्याचा मुलगा आणि आणखी एकाने गणेशला लाथा-बुक्क्यांनी माराहण करायला सुरूवात केली, तसंच त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड आणि दगडही टाकण्यात आला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group