नवी मुंबईच्या सानपाडा परिसरात गोळीबाराचा धक्कादायक प्रकार घडलाय. पाच ते सहा राऊंड गोळीबार करून दोन आरोपी फरार झाले आहेत. या गोळीबारात राजाराम ठोके जखमी झाले असल्याची माहिती आहे. भर दिवसा सानपाडा स्टेशन जवळील डी मार्ट परिसरात गोळीबार घडल्यानं , नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकणानंतर नवी मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
नवी मुंबईच्या सानपाडाजवळ डी मार्ट आहे. डी मार्टच्या बाजूलाच आरोपींनी गोळीबार केल्याची माहिती आहे. सानपाड्यातील स्टेशननजीकचा रस्ता कायम वर्दळीचा असतो. या रस्त्यावर अनेक लोक ये- जा करीत असतात. भर दिवसा हा गोळीबार घडल्यानंतर नागरीकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. गोळीबार करणारे दोन आरोपी होते. गोळीबार केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाले आहेत.
सानपाडा परिसरातील डी - मार्ट जवळ, गोळीबार करणारे दोन्ही आरोपी दुचाकीवरून आले होते. सानपाड्यातील नजीकच्या परीसरात येऊन आरोपींनी राजाराम ठोके या व्यक्तीवर गोळीबार केला. जवळपास पाच ते सहा राऊंड आरोपींनी गोळीबार केला. दोन ते तीन गोळ्या राजाराम यांना लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोळीबारानंतर जखमी व्यक्तीला तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आरोपींनी केलेल्या ५-६ राऊंड गोळीबारात राजाराम यांना दोन ते तीन गोळी लागल्याची शक्यता आहे. जखमी व्यक्तीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची चर्चा आहे.
धक्कादायक घडलेल्या घटनेनंतर सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आरोपी कुठल्या दिशेनं फरार झाले आहेत, या संदर्भातील सीसीटिव्ही फुटेज पोलीस तपासत आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस आणि फॉरेन्सिक टीम करीत आहेत.