आमदार सुरेश धस आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी वाद : गुणरत्न सदावर्ते  यांनी केली ''ही''  मागणी
आमदार सुरेश धस आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी वाद : गुणरत्न सदावर्ते यांनी केली ''ही'' मागणी
img
दैनिक भ्रमर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख  यांच्या हत्या प्रकरणी  संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या हत्या प्रकरणानंतर राजकरण तापले असून विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंढे यांच्यावर टीका करताना सुरेश धस यांनी बोलताना तीन अभिनेत्रींचा उल्लेख केला. त्यामध्ये प्राजक्ता माळी यांचं नाव देखील होतं. त्यानंतर शनिवारी प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांना चांगलंच सुनावलं, सुरेश धस यांनी आपली माफी मागावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली, तर मी माफी मागणार अशी प्रतिक्रिया यावर सुरेश धस यांनी दिली आहे. 


दरम्यान या वादावर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कला क्षेत्रातील महिलांना अपमानित करणे त्यांची खिल्ली उडवणे हे चुकीचं आहे. यामुळे सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांची माफी मागावी अशी मागणी गुणरत्न  सदावर्ते यांनी केली आहे. रश्मिका मंदाना असतील किंवा प्राजक्ता माळी असतील यांनी अल्पवधीत चांगलं काम करून आपल्या क्षेत्रात नाव कमावलं आहे. त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यामुळे कोणाला भेटायचं कोणाला नाही भेटायचं हा त्यांचा प्रश्न आहे, मात्र इथे जाणून -बूजन कलाकारांचा अपमान केला जात आहे, असा आरोप यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

तसेच , सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत असल्याचा आरोप देखील यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. सुरेश धस यांचे कार्यकर्ते मला धमकी देत आहेत, जीवे मारण्याची धमकी मला दिली आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. कालपासून मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. एक लक्षात ठेवा आता कुठेही राजेशाही आणि पाटीलकी चालत नाही. प्रशासन आणि पोलीस या धमक्यांची योग्य ती दखल घेतील, कारवाई होईल असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group