३१ डिसेम्बर २०२४
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वच जण काही ना काही प्लॅन करत असतात अशातच आता काहींनी जर आऊट ऑफ स्टेशन जायचं ठरवलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आज आणि उद्या प्लॅटफॉर्म तिकीट ते रिझर्वेशन दोन्ही बंद असणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन तिकीट विक्री बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वेळेवर धावपळ होऊ नये तुम्ही ही सविस्तर माहिती घेतलेली फायद्याचे आहे.
वर्षाच्या अखेरीस प्रचंड गर्दीचा अंदाज घेऊन मध्य रेल्वेने काही निवडक स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तात्पुरती थांबवली आहे.त्याचबरोबर ऑफलाइन आणि ऑनलाइन आरक्षणासह इतर कामेही बंद राहणार आहेत त्यामुळे तुम्ही जर आज उद्यामध्ये ट्रेननं फिरण्याचा प्लॅन करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुम्हाला रिझर्वेशन करता येणार नाही. गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबई आणि 14 प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाची विक्री करण्यासाठी बंदी घातली आहे. 2 जानेवारीपर्यंत हा नियम लागू राहणार आहे. या कालावधीत काही जणांना तिकिटांसाठी सूट देण्यात येईल असं सांगितलं आहे.
कोणत्या स्थानकात तिकीट विक्री बंद ? या यादीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, नागपूर, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, सोलापूर, कलबुर्गी आणि लातूर रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
काय आहे कारण ?
सोमवारी मुंबई गाड्यांबद्दल अपडेट देताना, मध्य रेल्वेने सांगितले की, ट्रेन क्रमांक बदलण्यासाठी मुंबई पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम (पीआरएस) काही तासांसाठी बंद राहील. मध्य रेल्वेने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की ‘‘31.12.2024 आणि 01.01.2025 च्या मध्यरात्री PRS 31.12.2024 ते 01.15.02020 पर्यंत 23.45 तासांपर्यंत बंद राहतील’’. बंद झाल्यामुळे, पीआरएस, कोचिंग रिफंड, चार्टिंग क्रियाकलाप, ट्रेन फायरिंग आणि इतर सेवा जसे की IVRS, चालू आरक्षण, चार्ट डिस्प्ले, टच स्क्रीन, रिफंड काउंटर आणि कोचिंग रिफंड टर्मिनल इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. मात्र, सध्याच्या रिफंड नियमांनुसार रिफंडसाठी टीडीआर जारी केला जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.
तसेच, वृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले, निरक्षर व्यक्ती आणि स्वतःची काळजी घेऊ शकत नसलेल्या महिला प्रवाशांना प्रवास सुलभ व्हावा यासाठी या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. मुंबई पीआरएस पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीममध्ये ट्रेन क्रमांकाच्या पुनर्नंबरीकरणामुळे ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही आरक्षणे बंद राहतील. या कालावधीत आरक्षणाव्यतिरिक्त कोणतेही काम केले जाणार नाही. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ऑफलाइन आणि ऑनलाइन सेवा 31 डिसेंबर रोजी सकाळी 11.45 ते 1 जानेवारी रोजी दुपारी 1.15 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहतील.
Copyright ©2025 Bhramar