''या'' शहरात आता  दुचाकी विक्रेत्यां प्रत्येक गाडीसोबत 2 हेल्मेट्स देणं बंधनकारक !
''या'' शहरात आता दुचाकी विक्रेत्यां प्रत्येक गाडीसोबत 2 हेल्मेट्स देणं बंधनकारक !
img
दैनिक भ्रमर
आजकल अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी रस्ते वाहतूक नियमांमध्ये वेळोवेळी बदल करण्यात येत असतात. दरम्यान,  शहरांमधील रहदारी बघता मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. पुण्यामध्ये अपघातांचं प्रमाण पाहता आता आरटीओ कडून त्यांना रोखण्यासाठी नवे नियमावली राबवण्यास सुरूवात झाली आहे. आता पुणे आरटीओ  च्या नव्या नियमावलीनुसार, दुचाकी विकणार्‍या दुकानदारांना त्यांच्या ग्राहकांना डिलेव्हरीच्या वेळेस 2 हेल्मेट्स द्यावी लागणार आहेत. मागील काही महिन्यांत दुचाकीस्वारांच्या अपघातांचे आणि त्यामध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आली होती परंतू त्याची अंमलबजावणी होत नसल्याने आता पुणे आरटीओ कडून नवे प्रयत्न सुरू झाले आहेत. रस्ते प्रवास सुरक्षेच्या दृष्टीने आता पुणे आरटीओ ने नियमांत बदल केले आहेत. त्याबाबतची अधिकृत नोटीस मोटारसायकल डीलरशीप्सना देण्यात आली आहे. यामध्ये हेल्मेट देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. प्रत्येक नव्या मोटारसायकलच्या विक्री वेळेस हेल्मेट्स देखील द्यावी लागणार आहेत.

अपघात कमी करण्याच्या दृष्टीने पुणे ट्राफिक पोलिसांकडून हेल्मेट सक्ती कठोर केली जाणार आहे. हेल्मेट न घालता प्रवास करणार्‍यांना रोखण्यासाठी आता सीसीटीव्ही कॅमेर्‍यामधून लक्ष ठेवले जाणार आहे. नव्या नियमांच्या खाली आता अधिक कठोर पणे लक्ष ठेवले जाणार आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group