शरद पवार महायुतीत सहभागी होणार?  गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं  मोठं वक्तव्य
शरद पवार महायुतीत सहभागी होणार? गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं मोठं वक्तव्य
img
दैनिक भ्रमर
 राज्यातील महायुती सरकार आणि महाविकास आघाडी  मधील हालचालींना वेग आला आहे. दरम्यान आता एक मोठी माहिती समोर येत आहे. राजकीय वर्तुळातशरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात येत आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. असं असलं तरी तसं झालं तर मग उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्ता सोडून शरद पवारांकडे जाणार की शरद पवार हे विरोधातील महाविकास आघाडी सोडून सत्तेत सहभागी होणार? हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते तथा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

“कदाचित राष्ट्रवादी शरद पवार गट महायुतीत सामील होऊ शकतो. याबाबत अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये अनेक बैठका झालेल्या आहेत”, असं मोठं भाकीत राज्यमंत्री योगेश कदम यांनी वर्तवलं आहे. “महाविकास आघाडीचे अनेक पराभूत उमेदवार महायुतीच्या वाटेवर आहेत. महाविकास आघाडीचा प्रत्येक पराभूत आमदार महायुतीसोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहे”, असाही मोठा दावा त्यांनी केला. तसेच “महायुतीची सत्ता ही कायम राहणार आहे”, असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group