उपनगर पोलिसांनी घेतले ज्येष्ठ बंटी बबली ला ताब्यात..... साडेसहा तोळ्याचे दागिने केले हस्तगत
उपनगर पोलिसांनी घेतले ज्येष्ठ बंटी बबली ला ताब्यात..... साडेसहा तोळ्याचे दागिने केले हस्तगत
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):-सोने खरेदी करण्याच्या उद्देशाने सराफांच्या दुकानात प्रवेश करून हात चलाकीने सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन ज्येष्ठ बंटी बबलीला उपनगर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचे साडेसहा तोडे सोने हस्तगत करण्यात आले आहे.

याबाबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले की, 17 डिसेंबर 2024 रोजी नाशिकरोड येथील पु.ना गाडगीळ अँड  सन्स या सराफी दुकानात जस्ट बंटी बबलीने साडेतीन तोळे वजनाच्या दोन बांगड्या हात चलाखीने करून नेल्याबाबत फिर्याद दिली होती. त्या अनुषंगाने तपास सुरू होता. त्यावेळी गाडगीळ अँड सन्स यांच्या नाशिक शाखेतून उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना फोन द्वारे कळवले की, नाशिकरोड शाखेमध्ये ज्या ज्येष्ठ बंटी बबली ने दागिने चोरले होते, त्या वर्णनाचे दोन्ही नाशिक शाखेत आले आहे.पो नि सपकाळ यांनी तात्काळ पथक पाठवून स्वामीनारायण पार्क, नवान रोड, अहमदाबाद, गुजरात येथील चंद्रकांत विनोदभाई परमार(वय ५५) व त्याची बहीण पूनम कमलेश शर्मा (वय ५७) या ज्येष्ठ बंटी बबलीना ताब्यात घेतले असता त्यांची चौकशी केली. 

त्यांनी नाशिकरोड येथील पु.ना गाडगीळ यांच्या दुकानात झालेल्या चोरीची कबुली दिली,त्यांना विश्वासात घेऊन आणखीन माहिती विचारली असता त्यांनी यापूर्वी सोलापूर येथील बाजार पोलीस ठाणे व पुणे शहरातील सहकार नगर पोलीस ठाणे येथे याच पद्धतीच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पाच लाख,तीस हजार आठशे सोळा रुपये किमतीचे साडेसहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. या ज्येष्ठ बंटी बबली वर गुजरात मध्ये कर्ज झाल्यामुळे त्यांनी हा फंडा वापरण्याचे सांगितले.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव कुलपगार यांच्या मार्गदर्शनाखाली  गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, सुरेश गवळी, पोलीस हवालदार विनोद लखन, इम्रान शेख,जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, सौरभ लोंढे, संदेश रंगतवान यांनी कामगिरी पार पाडली. या जेष्ठ बंटी बबली कडून पोलिसांनी अनेक गुन्ह्यांची उकल केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचा वातावरण निर्माण झाले आहे व पोलिसांप्रती विश्वास निर्माण झाला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group