सुखरूप प्रसूती म्हणजे महिलेचा पुनर्जन्मच असतो असे म्हणतात ते खरेच आहे. प्रसूती म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो पण एका मातेने आपल्या बाळासह स्वतःचा जीव गमावला असल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रसूतीदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने मातेसह बाळाचा मृत्यू झाल्याची घटना पालघरमध्ये घडली आहे.
महिलेचा मृत्यू झाल्यांनतर गर्भात असलेल्या बाळाला डॉक्टरांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण शक्य झाले नाही. पालघर जिल्ह्यात प्रसूतीदरम्यान महिलेचा हृदयविकाराच्या झटका आल्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे. जव्हारच्या पतंगशाह कॉटेज रुग्णालयात ही घटना घडली. पसूतीदरम्यान बाळालाही वाचवण्यात डॉक्टर असमर्थ ठरले. कुंता वैभव पडवळे असे मृत महिलेचे नाव आहे, त्या विक्रमगड तालुक्यातील गलतारे गावात राहत होत्या.
प्राथमिक माहितीनुसार < मंगळवारी रात्री त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तेथून त्यांना जव्हार येथील शासकीय पतंगशाह कॉटेज रुग्णालयात पाठवण्यात आले. प्रसूतीदरम्यान हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. त्यानंतर गर्भात असलेल्या बाळाला डॉक्टरांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण शक्य झाले नाही. बाळाचाही मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.