घाटकोपर  होर्डिंग दुर्घटनेतील आरोपीस सात महिन्यांनी अटक,  १७ जणांचा गेला होता बळी
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपीस सात महिन्यांनी अटक, १७ जणांचा गेला होता बळी
img
दैनिक भ्रमर

मुंबईत १३ मे २०२४ रोजी घाटकोपरमध्ये दुर्घटना झाली होती. त्या दिवशी जोरदार वादळ आले होते. घाटकोपरमधील छेदा नगरातील पेट्रोप पंपावर असलेले मोठे होर्डिंग कोसळले होते. हे अवैध होर्डिंग १५ हजार वर्ग फूटापेक्षा मोठे होते. या होर्डिंगची नोंद लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये होती. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच ७० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. या दुर्घटनेतील आरोपी सात महिन्यांपासून फरार होता. या आरोपीला बेड्या ठोकण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेने ३० डिसेंबर रोजी अरशद खान याला लखनऊ येथून अटक केली आहे.

घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील व्यवसायिक अर्शद खान याला सात महिन्यांनंतर अटक करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेने व्यापारी अर्शद खान सोमवारी अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अर्शद खान याला लखनऊमध्ये अटक करण्यात आली आहे. या होर्डिंग घटनेशी संबंधित आर्थिक व्यवहार उघड करण्यासाठी त्याची अटक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मुंबई पोलिसांनी अर्शद खान याचा सर्वत्र शोध घेतला होता. परंतु तो आतापर्यंत मिळाला नव्हता.


इतर बातम्या
Join Whatsapp Group