"ही तर सुरुवात , ठाकरेंच्या शिवसेनेची बोट बुडणार आहे" , शिंदेंच्या खासदाराचे संकेत
img
Dipali Ghadwaje
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पाडली आणि पक्षच ताब्यात घेतला. आता, विधानसभा निवडणुकीनंतरही पक्षात फूट पडणार आहे. पक्षफुटीनंतर ठाकरेंना साथ देणारे माजी आमदार राजन साळवी हे शिवसेनेची मशाल सोडून भाजपचे कमळ हाती घेणार असल्याचे वृत्त आहे. तर, दुसरीकडे ठाकरेंचे मुंबईतील आमदार त्यांना सोडणार असल्याचे संकेत शिंदे गटाच्या खासदाराने दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव करत सत्ता मिळवली. या निवडणुकीत ठाकरेंची अवघे 20 आमदार निवडून आले. या निवडणुकीत अनेकांना पराभवाचा धक्का बसला होता. आता राजन साळवींनंतर आणखी काही विद्यमान आमदार ठाकरेंची साथ सोडणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

शिवसेना उबाठाला ओहोटी लागायला सुरुवात झाली आहे अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली. माजी आमदार राजन साळवी हे ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले नरेश म्हस्के 

उद्धव ठाकरेंना जोपर्यंत माणसांची गरज असते तोपर्यंत त्याला विचारतात. नंतर वाऱ्यावर सोडताता असा हल्लाबोलही त्यांनी केला. ठाकरेंच्या शिवसेनेची बोट बुडणार आहे ही सुरुवात असल्याचे त्यांनी म्हटले.

शिवसेना ठाकरे गटाला ओहोटी लागली आहे. आता, मुंबईतील आमदारही त्यांची साथ सोडणार असल्याचा दावा केला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. महायुती म्हणून लढण्याची तयारी आहे, असे त्यांनी म्हटले. युतीचे नेते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील. महापालिकेत युती नाही झाली तरी स्वतंत्रपणे लढण्याची देखील आमची तयारी असून तेवढी आमची ताकद असल्याचेही खासदार म्हस्के यांनी म्हटले.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group