ह्रदयद्रावक ! तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, 4 भाविकांचा मृत्यू
ह्रदयद्रावक ! तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, 4 भाविकांचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर
आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात एक ह्रदयद्रावक घटना घडली असून पास केंद्रावर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये  चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिरुपती मंदिरातील वैकुंठ द्वार दर्शन दहा दिवसांसाठी खुले करण्यात आले आहे. या दर्शनाचे तिकीट मिळवण्यासाठी हजारो भाविक विविध तिकीट केंद्रांवर सकाळपासून रांगा लावून उभे होते. यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली, ज्यात तीन-चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर तात्काळ तिरुपती पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. अजूनही हजारो भाविक दर्शनासाठी रांगा लावून आहेत 

भाविकांना बैरागी पट्टीडा पार्क येथे पास घेण्यासाठी लायनीत उभे राहायला सांगितले तेव्हा ही चेंगराचेंगरीची घटना घडली. चेंगराचेंगरीनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला. त्यात चार भाविकांचा मृत्यू झाला. यामध्ये मल्लिका नावाच्या एका महिलेचा समावेश आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिरुपती पोलिसांनी प्रयत्न केले. त्यांनी थोड्याच वेळात परिस्थितीवर नियंत्रणही मिळवलं.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार < दर्शन घेण्यासाठी पास घेण्यासाठी तब्बल 4 हजार भाविक उभे होते, अशी माहिती मिळत आहे. इथल्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर समितीचे चेअरमन बीआर नायडू यांनी आपातकालीन बैठक बोलावली आहे. त्यांनी फोनवरुन अधिकाऱ्यांशी बातचिक करुन घटनेची माहिती जाणून घेतली आहे. तसेच बैठकीनंतर ते माध्यमांना प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group