नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना लसीबद्दल संभ्रम निर्माण करून अनेक गैरप्रकार ऐकायला, बघायला व वाचायला मिळत आहेत. यामुळे सायबर हॅकर्सनी लोकांची फसवणूक करण्यासाठी भन्नाट शक्कल लढवली आहे. यात स्कॅमर्स निष्पाप लोकांना फोन करून कोरोना लसीशी संबंधित माहिती विचारतात आणि त्यांच्या बँक खात्याविषयीच्या माहितीची देखील चोरी करतात. अनेक लोक सहज त्यांच्या तावडीत सापडतात आणि नंतर ते मोठ्या आर्थिक फसवणुकीचे बळी ठरतात. सायबर गुन्हेगार फसवणुकीचा हा खेळ कसा रचतात आणि ते कसे टाळावे याकडे आपण एक नजर टाकू या.
सायबर फसवणूक अनेक प्रकारे होत असते. काही फसवणूक करणारे एसएमएस-मेसेजची मदत घेतात, तर काही सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक करतात. फसवणूक करणारे सोशल मीडियावर बनावट पोस्ट आणि जाहिराती तयार करून लोकांची दिशाभूल करतात. सध्या तर कोरोना लसीच्या नावाखाली अशी फसवणूक होत आहे. यावेळी सर्वात मोठा धोका म्हणजे कॉलद्वारे होणारी फसवणूक. सायबर गुन्हेगारांसाठी, 'फोन कॉल' हा फसवणूक करण्याचा एक भन्नाट मार्ग आहे, ज्यामुळे काही मिनिटांत फसवणूक केली जावू शकते. कोरोना लसीच्या नावाखाली फसवणूक करणारे निष्पाप लोकांना कसे अडकवतात.
आरोग्य विभाग किंवा लस केंद्राचे सरकारी अधिकारी असल्याचे सांगून करणारे हे भामटे कॉल करतात. ते तुम्हाला विचारतात की तुम्हाला कोरोनाची लस मिळाली आहे की नाही. हो असेल तर एक दाबा, घेतली नसेल तर दोन दाबा. त्यांना उत्तर देताच l बँक खाते रिकामे होते. अशाप्रकारे कोरोना लसीच्या नावाखाली सायबर गुन्हेगार लोकांना आपला शिकार बनवतात. या स्कॅमपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या फोन कॉल किंवा sms ला प्रतिसाद देऊ नका. कोणी तुम्हाला कोरोना लसीसंदर्भात कॉल किंवा मेसेज करत असेल आणि तो सरकारी कर्मचारी असल्याचा दावा करत असेल तर सावध राहा. कोणतीही माहिती देण्यापूर्वी त्याची ओळख आणि सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
तसेच आपल्या सर्व मित्रांना आणि आपल्या फेसबुक फॉलोअर्सना पाठवून. ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला हवे. कोराना रोगापासून रक्षण करण्यासाठी सर्वांनी लस घेतली व सर्वांनी त्याचा लाभ घेतला मात्र आता हे हॅकर्स तुम्हाला कॉल करतील आणि म्हणतील की आम्ही आरोग्य विभागाच्या वतीने एक सर्वेक्षण करत आहोत, तुम्ही तुमची कोविड लस कोरोनाच्या वेळी वापरली की नाही, जर तुम्ही ती वापरली असेल तर कृपया एक दाबा आणि तुम्ही वापरली नसेल तर. कृपया दोन दाबा या प्रकारचा कॉल मिळवा. त्यामुळे लगेच कट करा.