उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देणारा तरूण पोलिसांच्या ताब्यात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देणारा तरूण पोलिसांच्या ताब्यात
img
दैनिक भ्रमर
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका तरुणाने धमकी दिल्याचं समोर  आला होता. शिंदेंना धमकी देणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण शिंदे यांना शिवीगाळ करत आहे. हितेश धेंडे असे धमकी देणाऱ्या तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर  आली असून आरोपी हितेश झेंडे याला अखेर ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुलुंडच्या जंगलातून पोलिसांनी मोठ्या कसोशीने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.हा तरुण सध्या ठाणे शहरातील श्रीनगर भागातील वरळीपाडा येथे राहत असून त्याचे वय २४ वर्षे असल्याची माहिती आहे.

हितेश धेंडे याचे ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सुरक्षारक्षकांशी वाद झाले होते. याच रागातून त्याने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर गोळीबार करण्याची धमकी इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याचा धमकीचा व्हिडिओ व्हायरल होताच शिवसैनिकांनी रविवारी रात्री ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी 6 तपास पथकं रवाना करत आरोपी हितेश झेंडे याचा कसून शोध घेतला. यावेळी मुलुंडच्या घोटीपाडा परिसरातील जंगलात हितेश पोलिसांना सापडला. त्याला ताब्यात घेऊन श्रीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे.

ठाण्याचे पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 6 ते 7 पथक तपास करत होते . वागळे इस्टेट परिसरातील घाटीपाडा परिसरातून ताब्यात घेतलं आहे. आरोपी मंत्रालयात जात होता, अनेक सरकारी कार्यालयात जात असल्याची माहिती आहे. आरोपीचे शिक्षण हे नववी ही पास असून तो कोणतेही काम करत नाही . हा धमकीचा व्हिडीओ हा त्याने स्वतः बनवला आणि इन्स्टाग्रामवर टाकला. आरोपीवर श्रीनगर आणि राबोडी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group