शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या कारला अपघात ;
शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या कारला अपघात ; "ही" माहिती आली समोर
img
Dipali Ghadwaje
शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वारा जवळ हा अपघात घडला. अपघात झाला त्यावेळी खासदार वायकर गाडीत असल्याची माहिती समोर येत आहे.

टेम्पो आणि वायकरांच्या गाडीची धडक झाल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ हा अपघात झाला.  या अपघातात कुठली जीवित हानी किंवा कोणी जखमी झालय का याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

खासदार रवींद्र वायकर यांच्याकडून वनराई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. वनराई पोलीस हा अपघात होता की काही घातपात या संदर्भात रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील तपास करत आहेत...


रविवारी मध्यरात्री उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीचा अपघात झाला. यावेळी खासदार वाईकरही गाडीत असल्याचं समजतंय. पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ मध्यरात्री ही घटना घडली. 

पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.  आयशर टेम्पो आणि वायकरांच्या गाडीची रविवारी मध्यरात्री धडक झाली. अपघात झाला त्यावेळी रविंद्र वायकरही गाडीत होते. अपघातात जीवित हानी किंवा कोणी जखमी असल्याची माहिती अद्याप मिळालेली नसून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघाताबद्दल अधिक चौकशी केली जात आहे.

दरम्यान या अपघाताबद्दल मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार , खासदार रवींद्र वायकर यांच्या कारच्या अपघातात टेम्पोची वायकरांच्या गाडीला धडक दिली असून चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती  आता समोर आली दिली आहे. जोगेश्वरीचा सीआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वारासमोर झालेल्या या दुर्घटनेत पोलीस चौकशी सुरू आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group