“मी नाराज आहे, भाजपच्या वाटेवर आहे हे मला तुमच्या माध्यमातून समजतय
“मी नाराज आहे, भाजपच्या वाटेवर आहे हे मला तुमच्या माध्यमातून समजतय" , पत्रकारांच्या प्रश्नावर नेमकं काय म्हणाले राजन साळवी
img
Dipali Ghadwaje
कोकणातील राजापूरचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे लवकरच भाजपत प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. राजन साळवी हे उद्धव ठाकरे गटाचे कोकणातील मोठे नेते मानले जातात. आज स्वत: राजन साळवी यांनी माध्यमांसमोर येऊन या बद्दल माहिती दिली आहे. 

काय म्हणाले राजन साळवी ?

एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , “मी ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे. पराभव झाल्याची मोठी खंत, वेदना मला व मतदारसंघातील माझ्या जनतेला आहेत” असं राजन साळवी म्हणाले. “मी नाराज आहे, भाजपच्या वाटेवर आहे हे मला तुमच्या माध्यमातून समजतय. पण या सर्व अफवा आहेत. मी निष्ठावंत सैनिक आहे. बाळासाहेबांचाच सैनिक राहणार. या बाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही” असं राजन साळवी म्हणाले.

“पराभवाची खंत आहे. पणी मी नाराज नाही. भाजपात प्रवेश करणार या अफवा आहेत” असं राजन साळवी यांनी स्पष्ट केलं. भाजपकडून ऑफर आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले की, “पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारणारच. तसा प्रयत्न भाजप आणि अन्य कोणाचा असू शकतो. ते भाजप नेत्यांच मत आहे”

निवडणूक झाल्यावर पक्षातील वरिष्ठांकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला का? त्यावर राजन साळवी म्हणाले की, “पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली होती. त्यात पराभवाची कारण काय? यावर आत्मचिंतन झालं. योग्य सूचना देण्यात आल्या” भाजपमधून आपल्याशी कोणी संपर्क साधला नाही, हे राजन साळवी यांनी स्पष्ट केलं. 

एसीबीकडून सुरु असलेल्या चौकशीवर म्हणाले की, “अँटी करप्शन ब्युरोकडून माझी आणि माझ्या कुटुंबाची चौकशी सुरु आहे. आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सुट्टीनंतर निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर त्यांचा काय प्रयत्न असेल माहित नाही, पण टांगती तलवार कायम आहे”

 

इतर बातम्या
Join Whatsapp Group