मोठी बातमी :  फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना दणका ; शहरप्रमुखासह ३५ पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
मोठी बातमी : फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना दणका ; शहरप्रमुखासह ३५ पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
img
Dipali Ghadwaje
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाला गळती सुरू झाली आहे. नुकतेच पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राजीनामा देत पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले. 

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संभाजीनगर येथील शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून त्यांच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व शहरप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. स्वामी यांच्यासोबत पक्षातील ३५ पदाधिकाऱ्यांनीही सोडचिठ्ठी दिली आहे. 

पक्षात मानसन्मान मिळत नसल्याचा आरोप करून विश्वनाथ स्वामी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत पक्षाचे उपजिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक, युवासेनेचे पदाधिकारी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारीच एकनाथ पवारांनी दिला राजीनामा 

ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी सुषमा अंधारे, विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत पक्ष सोडला आहे. एकनाथ पवार यांनी नांदेडमधल्या लोहा कंधार मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. माझ्या पक्षातील काही लोकांनी पराभूत करण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला होता. कालच त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आणि आज छत्रपती संभाजीनगरमधील शहरप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला रामराम केला आहे. आगामी  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी  ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group