राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र लिहीत एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर हे पत्र लिहिले असल्याची माहिती आहे. या विधासनसभा निवडणुकीत सर्व उमेदवारांना शिवसेनेचा पाठींबा असल्याचं या पत्रात म्हंटले आहे.
महाराष्ट्रात महायुतीने आपलं सरकार स्थापन केलं आहे. आता भाजपाचं लक्ष्य दिल्ली विधानसभा निवडणूकांकडे लागलं आहे. दिल्लीमध्ये 5 फेब्रुवारीला विधानसभा निवडणूका होणार आहे. या निवडणूकीत शिवसेना थेट रिंगणात उतरणार नसली तरीही आपला पठिंबा भाजपाला असेल असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी पत्राद्वारे आपली भूमिका जाहीर केली आहे.
दिल्ली विधानसभेच्या 70 जागा आहेत. यासाठी 5 फेब्रुवारीला मतदान आणि 8 फेब्रुवारीला त्याचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. सध्या दिल्लीत विधानसभेसाठीचा प्रचार अंतिम टप्प्याच्या दिशेने सुरू झाला आहे.