कार आणि टेम्पोच्या भीषण अपघात होऊन 4 महिला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना लातूर येथे घडली आहे.
उदगीर तालुक्यातील एकुरकाजवळ हा अपघात झाला आहे. अपघातात इतका भीषण होता की , 4 महिला जागीच ठार झाल्या आहेत. तर तीन जण जखमी झाले आहे. दरम्यान, जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर तालुक्यातील एकुरकाजवळ आज गुरुवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मारुती स्विफ्ट डिझायर कारने या महिला उदगीरहून एकुरगाकडे जात होत्या. एकुरगा गावाजवळ पोहोचले असताना भरधाव आयशर टेम्पोला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चुराडा झाला. अपघातात चार महिला जागीच ठार झाल्या.
या अपघातात मंगलबाई गोविंद जाधव (वय ५५ वर्ष राहणार एकुरका) प्रतिभा संजय भंडे (वय ३० राहणार दावणगावं), प्रणिता पांडुरंग बिरादार (वय २५ राहणार होणाळी) अन्यना रणजित भंडे (वय १४ वर्ष राहणार दावणगावं) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. अन्य तिघा जखमीवर उपचार सुरू आहेत. सर्व मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उदगीर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकाच वेळी चार महिलांचा मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. रुग्णालयाच्या परिसरात कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. या प्रकरणाची पोलिसांनी नोंद केली असून अधिक तपास करत आहे.