भारतीय कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानचा कांदा आयात...कांदा उत्पादकांमध्ये संतापाची लाट
भारतीय कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानचा कांदा आयात...कांदा उत्पादकांमध्ये संतापाची लाट
img
दैनिक भ्रमर
लासलगाव (शेखर देसाई) :- केंद्र सरकारकडून कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्यासाठी परवानगी दिल्याने अफगाणिस्तान मधून पंजाब राज्यातील अमृतसर, जालिंदर या शहरांमध्ये अकरा मालट्रक मधून कांदा दाखल झाला आहे. कांद्याने भरलेल्या पंचेचाळीस ते पन्नास ट्रक बॉर्डरवर उभ्या असल्याने येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतात अफगाणिस्तानचा कांदा दाखल होणार असल्यामुळे आता महाराष्ट्रसह देशभरातील कांदा उत्पादकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाकडून किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत पाच लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला होता. त्यातील कांदा दिल्ली, मुंबई, चेन्नई, कलकत्ता, भुवनेश्वर या देशातील मेगा मेट्रो सिटी मध्ये तीस ते पस्तीस रुपये किलो प्रमाणे केंद्रे सुरू करत विक्री सुरू केली. मात्र कांद्याचे दर नियंत्रणात येत नसल्यामुळे आता केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयातीला परवानगी दिली. त्यामुळे अफगाणिस्तान मधून पंजाब राज्यातील अमृतसर, जालिंदर या शहरांमध्ये अकरा मालट्रक मधून 300 टन अधिक कांदा दाखल झाला आहे आणखीन मोठ्या प्रमाणात कांदा दाखल होण्यासाठी भारतीय बॉर्डरवर पंचेचाळीस ते पन्नास ट्रक उभे आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group