शेतकऱ्यांसाठी आता मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने पीएम-आशा या योजनेसाठी 35,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली.
मोदी सरकारने पीएम-आशा या योजनेसाठी 35,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांवर उच्चस्तरीय समितीच्या शिफारसी स्वीकारण्यात आल्या आहेत. तसेच शेतकऱ्यासाठी देखील महत्वाचा निर्णय घेतला आहे.सरकारने जाहीर केले की पीएम-आशा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या मिळकतीत वाढ होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाने डाळ आणि तिळाच्या शेती पिकांना किमान मूल्य मिळणार आहे.भारतात या प्रकारच्या पिकांमध्ये आत्मनिर्भर होणार आहे. त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
पीएम-आशा ही एकात्मिक योजना आहे. शेतकरी आणि ग्राहकांच्या सेवेसाठी केंद्र सरकारने किंमत समर्थन योजना (PSS) आणि किंमत स्थिरीकरण निधी (PSF) योजना PM आशा योजनेमध्ये विलीन केल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला किमान हमी भाव मिळण्यास मदत होईलच, शिवाय ग्राहकांचीही सोय होणार आहे.