वा ! राज्याला  मिळणार 3 नव्या वंदे भारत !
वा ! राज्याला मिळणार 3 नव्या वंदे भारत !
img
दैनिक भ्रमर
आज म्हणजेच 15 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडमधील जमशेदपुरातून देशभरातील विविध राज्यांसाठी आणखी 10 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. यामध्ये महाराष्ट्रातील तीन ट्रेनचा देखील समावेश आहे.

महाराष्ट्राताल तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत. या एक्सप्रेसमध्ये पुणे-हुबळी, नागपूर सिकंदराबाद आणि कोल्हापूर पुणे अशा मार्गांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 15 सप्टेंबरला देशभरात नव्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यामध्ये देशभरातील इतर वंदे भारत एक्सप्रेसचा देखील समावेश आहे.

 वेळापत्रक

   >> वंदे भारत ट्रेन क्रमांक 20669 ही गाडी हुबळी-सांगली-पुणे बुधवार, शुक्रवार, रविवारी हुबळीहून पहाटे 5 ला निघेल. धारवाडला पहाटे 5 वाजून 17 मिनिटांनी येईल. बेळगावात सकाळी 6.55 ला पोहोचेल. सांगतील सकाळी 9.30 ला येईल. तर पुण्यात दुपारी 1.30 वाजता येईल.

 >>वंदे भारत ट्रेन क्रमांक 20670 ही पुणे-सांगली हुबळी ट्रेन गुरुवारी, शनिवार, सोमवारी असेल. जी पुण्यातून दुपारी 2.15 वाजता निघेल. सांगलीत संध्याकाळी 6.10 ला पोहोचेल. बेळगावी रात्री 8.34 ला पोहोचेल. धारवडला रात्री 10.30 ला येईल. तर हुबळीत रात्री 10.45 ला पोहोचेल.

  >>वंदे भारत ट्रेन क्रमांक 20673 ही कोल्हापूर-सांगली-पुणे गुरुवारी शनिवारी सोमवारी असेल. जी कोल्हापूरहून सकाळी 8.15 ला निघेल. सांगलीत सकाळी 9.05 ला येईल. किर्लोस्करवाडीत 9.42 ला येईल. तर पुण्यात दुपारी 1.30 वाजता पोहोचेल.

  >>वंदे भारत ट्रेन क्रमांक 20674 ही ट्रेन पुणे-सांगली-कोल्हापूर ही बुधवार शुक्रवार आणि रविवारी असेल. जी पुण्याहून दुपारी 2.15 सा निघेल. किर्लोस्करवाडीत 5.50 ला येईल. सांगलीत संध्याकाळी 6.10 ला येईल. तर कोल्हापुरात रात्री 7.40 ला पोहोचेल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group