नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- मुंबईत ६ डिसेंबरला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मुंबई, नाशिक रोड, मनमाडसह प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. २ ते ९ डिसेंबर दरम्यान ही बंदी असेल. ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.
प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रित करणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची हालचाल सुरळीत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
खालील स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री प्रतिबंधित असेल:
मुंबई विभाग: सीएसटी, दादर, ठाणे आणि कल्याण. भुसावळ विभाग: नाशिक, मनमाड, बडनेरा, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, अकोला, नांदुरा, मूर्तिजापूर, शेगाव, मलकापूर. नागपूर विभाग: नागपूर आणि वर्धा. पुणे विभाग: पुणे. सोलापूर विभाग: सोलापूर