विधानसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून राजकीय पक्षांच्या प्रचार सभा सुरु आहेत.महाविकस आघाडीच्या प्रचारफ सभेंची देखील रणधुमाळी सुरु आहे. दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. महाविकास आघाडी सत्तेत आली तर सोयाबीन खरेदी 7000 रुपये प्रति क्विंटल दराने करेल, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केली आहे.काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मल्लिकार्जून खरगे यांची पुण्यात जाहीर सभा झाली. या सभेनंतर खरगे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेला संबोधित केले यावेळी ते बोलत होते.
तसेच, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सोयाबीनला बोनससह ७ हजार रुपयांचा भाव देऊ, कांदा, कापसाला योग्य भाव देऊ, शेतकऱ्यांना ३ लाखांची कर्जमाफी देणार, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणार, महिलांना ३ हजार रुपये व मोफत बस प्रवास, २५ लाखांचा आरोग्य विमा व सरकारी नोकर भरती करु, असे आश्वासन मल्लिकार्जून खर्गे यांनी दिले.
दरम्यान , केंद्राने जाहीर केलेल्या हमीभावाव्यतिरिक्त, सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सात हजार रुपये मिळावेत यासाठी महाविकास आघाडी सरकार बोनस देईल तसेच कांद्याच्या दरासंदर्भात एक समिती स्थापन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. सोयाबीन उत्पादक शेतकरी गंभीर संकटाचा सामना करत आहेत आणि महाविकास आघाडीच्या या आश्वासनांमुळे महाराष्ट्रातील, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.