जन्मदात्या आईची हत्या करून तिचं मांस शिजवून खाल्ल, ''त्या'' हैवानाला मुंबई हायकोर्टाकडूनही फाशीची शिक्षा
जन्मदात्या आईची हत्या करून तिचं मांस शिजवून खाल्ल, ''त्या'' हैवानाला मुंबई हायकोर्टाकडूनही फाशीची शिक्षा
img
दैनिक भ्रमर
गुन्हेगारीच्या अनेक घटना घडतात, परंतु यामध्ये अशी एखादी घटना असते की ती ऐकून सुद्धा आपले हातपाय थरथरयला लागतील. दरम्यान अशीच घटना ज्यात आपल्या जन्मदात्या आईची हत्या करून तिचे मांस शिजवून खाणाऱ्या मुलाला  मुंबई उच्च न्यायालयाकडून मृत्यूदंडाच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे. कोल्हापूर कोर्टाने देखील या प्रकरणामध्ये फाशीची शिक्षा दिली होती. हे खून प्रकरण 2017 मधील आहे.

यावेळी मुंबई हायकोर्टाने आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवली. ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ असल्याने शिक्षा कायम ठेवली आहे. “आरोपी सुनील कोंचीकोरवीने केलेला गुन्हा अत्यंत गंभीर तो सुधारण्यासारखा नाही, त्यामुळे आरोपी समाजात राहू शकत नाही”, असं निरीक्षण यावेळी मुंबई हायकोर्टाने नोंदवलं. 

आरोपी सुनील कुंचीकोरवीने जन्मदात्या आईची दारूच्या पैशांसाठी हत्या केली होती. आरोपी तेवढ्यावरच थांबला नव्हता तर त्याने आपल्या आईच्या शरीराचे लचके तोडत ते शिजवून खालले देखील होते.  मुंबई उच्च न्यायालयाने आज केलेल्या सुनावणीमध्ये आपलं मत मांडताना आरोपीने केवळ आईचा खून केलेला नाही तर त्याच्या पश्चात शरीरातून मेंदू, हार्ट, लिव्हर, किडनी, आतडी काढून शिजवून खाल्ल्याचं म्हटलं आहे. खंडपीठाने माहिती देताना या प्रकरणातील आरोपी जेल मध्येही अशाप्रकारचं कृत्य करू शकतो त्यामुळे फाशी पेक्षा कमी शिक्षा दिली जाऊ नये. असं न्यायाधीशांनी म्हटलं आहे. "त्या आईने जे दुःख अनुभवले ते शब्दात सांगता येणार नाही. दारूची हौस भागवण्यासाठी त्याने हा गुन्हा केला आहे. त्याने बळजबरीने आपल्या आईचे जीवन संपवले, हा मातृत्वाचा टोकाचा अपमान आहे,” असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश कृष्णाजी जाधव यांनी निरीक्षण नोंदवले आहे.

काय आहे प्रकरण ? 

आरोपी सुनील कोंचीकोरवी याची आई फुगे आणि कंगवे विकून उदरनिर्वाह भागवायची. तिला राजू आणि सुनील असे दोन मुलं होती. सुनील हा लहान मुलगा होता. त्याला दारुचं व्यसन होतं. घटनेच्या दिवशी आई रात्री 10 वाजता घरी आली तेव्हा सुनीलने तिच्याकडे पैशांची मागणी केली. आईने नकार दिल्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यावेळी आरोपी सुनील याने आपल्या आईवर चाकूने हल्ला केला. यानंतर त्याने तिच्या शरीराचे तुकडे करत लचके तोडले.

घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आरोपी त्याच्या आईच्या हृदयाला शिजवणार होता. पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्याकडे असणारा चाकूही जप्त केला. याप्रकरणी तब्बल 12 जणांनी साक्ष दिली तेव्हा त्याला शिक्षा सुनावण्यात आली.

संबंधित घटना ही 28 ऑगस्ट 2017 मध्ये घडली होती. आरोपीने आपल्या 63 वर्षाच्या आईची हत्या करत तिच्या शरीराचे अवयव शिजवले आणि ते खाल्ले देखील होते. या प्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयाने 2021 मध्ये आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आता मुंबई हायकोर्टानेदेखील योग्य असल्याचं ठरवलं आहे.



इतर बातम्या
Join Whatsapp Group