यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार पाकिस्तानमध्ये रंगणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी साठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार का याबाबत आतापर्यंत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. मात्र आता बीसीसीआई उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सोमवारी मोठं वक्तव्य केलं. टीम इंडिया पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला जाणार की नाही? यावर सरकारच्या मंजूरीनंतरच घेतला जाईल, असं राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे.
याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. मात्र आंतरराष्ट्रीय दौऱ्यांसाठी आम्ही नेहमीच सरकारची परवानगी घेतो, असं आमचं धोरण आहे. आमच्या संघाने कोणत्याही देशात जायचं की नाही, हे सरकारवर अवलंबून आहे. याप्रकरणी सरकार जो काही निर्णय घेईल, आम्ही त्याचे पालन करू, असं राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वेळापत्रकानुसार सामन्यांचे बुकिंग सुरू केले आहे. आयसीसी अधिकृत घोषणा करेल तेव्हाच वेळापत्रक निश्चित केलं जाईल. त्यासाठी महिला T20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यादरम्यान PCB चेअरमन मोहसिन नक्वी जय शाह यांची भेट घेतील, अशी माहिती देखील समोर आली आहे.
तसेच , पाकिस्तानकडून देण्यात आलेल्या प्रस्तावित वेळापत्रकानुसार पुढील वर्षी 19 फेब्रुवारी रोजी स्पर्धा सुरू होईल. अंतिम सामना 9 मार्चला होणार असून 10 मार्च हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र, भारताचे सामने हायब्रीड पद्धतीने खेळवले जाणार का? असा सवाल देखील विचारला जात आहे.