पंतप्रधान मोदींच्या ''या'' योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 10 हजार, पाहा कोण असेल पात्र ?
पंतप्रधान मोदींच्या ''या'' योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 10 हजार, पाहा कोण असेल पात्र ?
img
दैनिक भ्रमर
राज्यात महायुती सरकारने सुरु केलेल्या बहुचर्चित लाडकी बहीण योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला. या योजनेचा फायदा महिलांना झाला आहे . दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी एका योजनेचा प्रारंभ करणार आहेत, ज्यातून जास्तीत जास्त महिलांना याचा फायदा होऊ शकतो. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सुभद्रा योजना’ सुरू करणार आहेत. या योजने अंतर्गत महिलांना दरवर्षी 10 हजार मिळणार आहेत. हे पैसे त्यांना दोन हप्त्यांमध्ये मिळतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना ओडिशातील महिलांसाठी सुरु करण्यात आलीआहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात या मोठ्या योजनेचा समावेश केला आणि ओडिशातील महिलांनी केवळ लोकसभा निवडणुकीतच नव्हे तर विधानसभा निवडणुकीतही भाजपला पूर्ण पाठिंबा दिला.

 या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्याला दोन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्ष 10-10 हजार रुपये मिळतील. प्रत्येक महिलेला पाच वर्षांत एकूण 50 हजार रुपये मिळणार आहेत. 21-60 वयोगटातील सर्व पात्र महिलांना सुभद्रा योजनेचा लाभ मिळेल. एका कुटुंबात दोन किंवा तीन पात्र महिला असतील तर सर्वांना याचा लाभ मिळेल. सरकारकडून विधवा निवृत्ती वेतन आणि शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या महिलांसह सर्व पात्र महिलांना मदत मिळेल. ही योजना पाच वर्षांसाठी सुरू केली जाईल, ज्याचा कालावधी आर्थिक वर्ष 2024-25 ते 2028-29 असा आहे. राज्य सरकारने यासाठी 55,825 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group