''या'' तारखेपासून UPI ग्राहकांना मिळणार ''ही'' मोठी सुविधा !
''या'' तारखेपासून UPI ग्राहकांना मिळणार ''ही'' मोठी सुविधा !
img
दैनिक भ्रमर
यूपीआय ग्राहकांसाठी आता मोठी सुविधा सुरु होणार आहे यामुळे  यूपीआय चा वापर करणे ग्राहकांना अधिकच सुलभ होणार आहे. आजकाल कॅश पेमेंट पेक्षा यूपीआय पेमेन्टला जास्त प्राध्यान्य दिले जाते. यामध्ये छोट्यात छोट्या पेमेंट पासून तर  मोठमोठ्या ट्रँजॅक्शन ही यूपीआय द्वारे केले जातात. यूपीआय चा वाढता वापर बघता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NCPI) लवकरच आपल्या ग्राहकांसाठी मोठी सुविधा उपलब्ध केली आहे.  तुम्ही जर यूपीआय पेमेंट करत असाल तर आता तुम्हाला मोठी सुविधा मिळणार आहे. या संदर्भात ‘लाइव्ह हिंदुस्थान’ने वृत्त दिलं आहे

दरम्यान, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लवकरच आपल्या ग्राहकांसाठी भीम यूपीआय लाइट ॲपमध्ये आता ऑटो टॉप-अप सुविधा सुरू करणार आहे. यामुळे युजर्सना वारंवार बँक खात्यातून ॲपमध्ये पैसे ट्रान्सफर करावे लागणार नाहीत. तुम्ही एकदा रक्कम निवडली आणि सेट केली की तुमच्या ॲपमधला बॅलन्स संपल्यावर ती निवडलेली रक्कम आपोआप ॲपमध्ये जमा होईल. ही सुविधा 31 ऑक्टोबरपासून सुरू केली जाणार आहे. एनपीसीआयने या संदर्भात सर्क्युलर प्रसिद्ध केलं आहे. ग्राहक हवं तेव्हा ही सुविधा बंद करू शकतात.

या यूपीआय लाइट पेमेंट सुविधेतील एक महत्त्वाची गोष्ट अशी की यासाठी कोणताही पिन टाकावा लागणार नाही. तुम्ही 500 रुपयांपर्यंतचे व्यवहार यूपीआय पिन न टाकता करू शकता. त्याहून जास्त पेमेंट करायचं असेल तर यूपीआय पिन टाकावा लागेल.

या सुविधेसाठी ग्राहकांना एक ठराविक रक्कम निवडावी लागेल जी त्यांच्या बँक अकाउंटमधून यूपीआय लाइट अकाउंटमध्ये येईल. समजा, एखाद्या ग्राहकाने 1500 रुपये टॉपअप रक्कम निवडली, तर त्याच्या यूपीआय लाइट अकाउंटमधील हे 1500 रुपये खर्च झाल्यावर अकाउंटमध्ये आपोआप 1500 रुपये जमा केले जातील. या सुविधेमुळे यूपीआय पेमेंट करणाऱ्यांना सुविधा मिळेल.

ग्राहकांना या यूपीआय लाइट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त दोन हजार रुपये ठेवता येतील. ग्राहकांना एका वेळी फक्त दोन हजार रुपयांचे टॉप अप करता येईल.

बँका व कंपन्यांसाठी नियम

  • बँका यूपीआय लाइटवर ऑटो टॉप-अपची सुविधा देतील.

  • बँक खात्यातून यूपीआय लाइट अकाउंटमध्ये एका दिवसात जास्तीत जास्त पाच वेळा पैसे ॲड करता येतील.

  • संबंधित थर्ड पार्टी पेमेंट ॲप सर्व्हिस कंपन्या आणि बँकांना मँडेट सुविधा देताना व्हेरिफिकेशन करावे लागेल.

इतर बातम्या
Join Whatsapp Group