बापरे ! DJ च्या आवाजाने डोक्याची नस फुटून  ब्रेन हॅमरेज
बापरे ! DJ च्या आवाजाने डोक्याची नस फुटून ब्रेन हॅमरेज
img
दैनिक भ्रमर

गणेशोत्सव असो नवरात्र असो किंवा अजून कोणतीही मिरवणू , लग्न समारंभ वाढदिवसाच्या पार्ट्या या ठिकाणी हमखास पणे डीजे वाजवला जातो . डीजे चा आवाजावर सर्व थिरकत असतात . डीजे आणि नाच म्हणजे एक वेगळाच आनंद अशी लोकांची धारणा आहे. परंतु या डीजेमुळे चक्क ब्रेन हॅमरेज झाल्याची घटना उघडकीस अली आहे .एका डीजे वाजवणाऱ्या तरुणाबाबत धक्कादायक घटना घडली. त्याच्या मेंदूला रक्तपुरवठा करणारी नस फुटली आणि ब्रेन हॅमरेज झालं, अशी बातमी उघडकीस आली आहे. छत्तीसगढमध्ये एका डीजे वाजवणाऱ्या तरुणाबाबत धक्कादायक घटना घडली. त्याच्या मेंदूला रक्तपुरवठा करणारी नस फुटली आणि ब्रेन हॅमरेज झालं, अशी बातमी उघडकीस आली आहे.

40 वर्षीय संजय जायस्वालवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तो बलरामपूरमधील सनावलचा रहिवासी आहे. त्याला 9 सप्टेंबरला अचानक चक्कर येऊ लागली आणि उलट्या झाल्या. त्याच्या कुटुंबियांनी त्याला अंबिकापूरमध्ये एका रुग्णालयात दाखल केलं. नंतर त्याला रायपूरला रेफर करण्यात आलं. डीजेच्या आवाजामुळे त्याच्या मेंदूची नस फुटली आणि रक्त गोठलं असावं, अशी शक्यता त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी वर्तवली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की ,  संजयला 9 सप्टेंबरला चक्कर आली आणि उलटी झाली. कुटुंबियांनी त्याला मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं. तिथे इअर नोज थ्रोट (ENT) विभागातील वरिष्ठ डॉक्टर शैलेंद्र गुप्ता यांनी त्याचे सीटी स्कॅन केले. रिपोर्टमध्ये त्याच्या डोक्यातील मागच्या बाजूची नस फुटल्याने ब्लड क्लॉट झालंय, असं दिसून आलं. त्यांनी याची माहिती वरिष्ठ डॉक्टरांना व प्राध्यापकांना दिली. रुग्णाच्या कुटुंबियांनी त्याला कोणताच आजार नव्हता, असं सांगितलं. त्याला ब्लडप्रेशरचाही त्रास नव्हता, रुग्णालयातही त्याचं बीपी नॉर्मल होतं, असं डॉ. गुप्ता यांनी सांगितलं.

संजय डीजे भाड्याने देण्याचा व्यवसाय करतो, असं त्याच्या कुटुंबाने सांगितलं. ज्या दिवशी त्याची तब्येत खराब झाली, त्यादिवशी त्याने डीजे वाजवला होता. नंतर त्याला उलटी झाली आणि चक्कर आली. डीजेच्या आवाजामुळे संजयला हा त्रास झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या दिलेल्या माहितीनुसार, माणूस जास्तीत जास्त 70 डेसिबलपर्यंत आवाज सहन करू शकतो. त्यापेक्षा जास्त डेसिबलचा आवाज त्याच्या कानांसाठी तसंच डोक्यासाठी धोकादायक होतो. डीजेच्या गाण्यांमधील आवाजाची तीव्रता 150 डेसिबलपेक्षा जास्त असते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group