धक्कादायक ! शेजाऱ्याच्या पत्नीवर घरात घुसून बलात्कार, ओढणीने बांधले हात-पाय
धक्कादायक ! शेजाऱ्याच्या पत्नीवर घरात घुसून बलात्कार, ओढणीने बांधले हात-पाय
img
दैनिक भ्रमर
दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनेमुळं महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसेंदिवस महिलांवरील वाढत्या आत्याचाराच्या घटना चिंताजनक आहेत . दरम्यान, अशीच एक धक्कादायक घटना ठाणे जिल्याच्या भाईंदर मध्ये घडली आहे . ठाणे जिल्ह्यातील भाईंदरमध्ये एकाने शेजाऱ्याच्या घरात घुसून त्याच्या पत्नीला ओढणीने बांधून बलात्कार केला. या घटनेने खळबळ उडाली असून पीडित महिलेने दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला.

या विषयी अधिक माहिती अशी की , आरोपी रात्री 11च्या सुमारास शेजाऱ्यांच्या घरात बळजबरीने घुसला. त्यावेळी घरात 38 वर्षीय पीडित महिला आणि तिची तीन वर्षांची लहान मुलगी होती. आरोपीने पीडितेचे ओढणीने हात-पाय बांधले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेवर तिच्या लहान मुलीसमोरच आरोपीने अत्याचार केला. आरोपीने तिच्यावर हल्लाही केल्याची माहिती भाईंदर पोलिसांनी दिली आहे. महिलेने दुसऱ्या दिवशी पोलिसात धाव घेतली आणि आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला गेला असून पोलिसांनी अटक केल्याची माहिती समजत आहे. भारतीय न्याय संहितेनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group