आज काल सोशल मीडिया वर रील्स बनवण्याचे फॅड लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतेय . आपल्या रील्स ला जास्तीत जास्त वीव्हज आणि लाईक्स कसे मिळतील आणि त्यासाठी आपला कॉन्टेन्ट अधिक इंट्रेस्टिंग कसा बनवता येईल यासाठी लोकं काहीही करायला तयार असतात रिल बनवण्यासाठी काही जण अनेक धोकादायक प्रयोग करतात, या स्टंटबाजीमुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. अशा अनेक घटना हल्ली ऐकायला मिळतात दरम्यान अशीच एक घटना हिमाचल प्रदेशातून समोर आली आहे .
हिमाचल प्रदेशातील डोंगरांमध्ये रिल बनवण्याचा एका व्हिडिओ समोर आला आहे. चंबा येथे एक युवती डोंगरांमध्ये जाऊन धोकादायक पद्धतीने रिल बनवत आहे. त्यानंतर मात्र अपघात घडला आणि तिला प्राणास मुकावे लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये एक युवती डोंगर दऱ्यांमध्ये रील बनवताना दिसत आहे. स्टार्ट आवाज येताच ती ‘बेपनाह प्यार है, तेरा इंतजार है…’ हे रोमँटिक गाणे म्हणू लागते. त्यानंतर ती युवती तिचा दुपट्टा हलवत डान्स स्टेप्स करते. त्याचवेळी तिचा चुकीच्या ठिकाणी पडतो अन् ती दऱ्यांमध्ये जाऊन पडते. हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला असून आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
दरम्यान , सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून युजर हैरान झाले आहे. काही जणांनी रिल बनवण्यासाठी धोकादायक स्टंट करु नका, असा सल्ला दिला आहे. लाईक्स आणि फॉलोअर्सपेक्षा आपले जीवन महत्वाचे आहे, असे काही युजरने म्हटले आहे.