कोणाचा मृत्यू कसा आणि कुठे होईल काहीच सांगता येत नाही. काही लोकं मोठ्यात मोठ्या झालेल्या अपघातातूनही अगदी सुखरूप बचावतात तर काही लोकांच्या मृत्यूला छोटीशी ठेस लागून अपघातही कारणीभूत ठरू शकतो, अशीच काहीशी अजब घटना ब्रिटनमधल्या एका व्यक्ती सोबत घडली आहे . आणि दुर्दैवाने त्यात त्याच मृत्यू झाल्याची माहिती आहे .
बॅरी ग्रिफिथ्स 57 वर्षांचे होते. ते वेल्समधील लँड्रिंडॉड येथे एकटेच राहत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना खूप भूक लागली म्हणून त्यांनी फ्रीजमध्ये ठेवलेला बर्गर काढला आणि तो खायला घेतला. पण फ्रीजमध्ये ठेवल्याने दोन्ही बर्गर चिकटले होते. ते वेगळे करण्यासाठी त्यांनी चाकू घेतला. चाकूने बर्गर कापताना हात घसरला आणि चाकू पोटात घुसला. त्यांचा मृत्यू झाला. ते एकटे राहत असल्याने त्यांचा मृत्यू झाला हे कोणालाच कळले नाही. काही दिवस मृतदेह तसाच पडून होता. रक्त किचन आणि बेडरूममध्ये पसरलं होतं. पोलीस हे सगळं पाहून चक्रावले. या माणसाचा मृत्यू इतक्या विचित्र परिस्थितीत झाला की हा खून आहे का? अशी शंका पोलिसांनाही येऊ लागली. या विषयी एका न्यूज वेबसाईट न रिपोर्ट दिल आहे .
दरम्यान , तपास केल्यावर बर्गरमुळे त्यांचा मृत्यू झाला या निष्कर्षावर पोलीस पोहोचले. फ्रीजरचा खालचा ड्रॉवर जेवण बाहेर काढता येईल अशा प्रकारे उघडा होता, असे डिटेक्टिव्ह चीफ इन्स्पेक्टर जॉनाथन रईस यांनी सांगितले. काही काळापूर्वी बॅरीला स्ट्रोक आला होता, तेव्हापासून तो फक्त त्याचा एक हात वापरू शकत होता, असे पोलीस तपासात उघड झाले.
किचन काउंटरवर दोन कच्चे बर्गर, एक चाकू आणि एक टी-टॉवेल ठेवला होता. त्यांच्या पोटाला झालेली जखम किचन काउंटरच्या हाइटजवळ होती. कदाचित ते जोर लावून चाकूने बर्गर कापण्याचा प्रयत्न करत होते. चाकूमुळे त्यांचा मृत्यू झाला असे पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमधून उघड झाले. ही घटना मागील वर्षी जुलै महिन्यात घडली होती. त्यांचा मृतदेह आठवडाभराहून अधिक काळ घरात पडून होता. त्यांचे फोन, पाकीट आणि घरातील इतर वस्तू जागच्या जागी होत्या.