बारामतीत  निवडणूक लढवण्यासंदर्भात अजित पवारांनी घेतला ''हा'' मोठा  निर्णय
बारामतीत निवडणूक लढवण्यासंदर्भात अजित पवारांनी घेतला ''हा'' मोठा निर्णय
img
दैनिक भ्रमर

विधानसभेच्या आधी राजकारणातील घडामोडींना चांगलाच जोर आला आहे.  दरम्यान, काही दिवसांआधी  बारामतीमधून विधानसभा लढणार नसल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते . आपण लाखाने निवडून येणारी माणसं… पण कोट्यवधींची विकासकामे करूनही जर लोक वेगळा विचार करत असतील तर मी देखील माणूस आहे, वेगळा विचार करू शकतो, असे सांगत बारामतीमधून विधानसभा लढणार नसल्याचे संकेत  अजित पवार यांनी दिले. त्यामुळे मागील महिन्याभरापासून अजित पवार बारामतीमधून लढणार नाहीत, अशी चर्चा झाली. तसेच चिरंजीव जय पवार यांच्या उमेदवारीची मागणी होत आहे, त्यासंदर्भात कोअर कमिटी निर्णय घेईल, असेही अजितदादांनी सांगितले. 

दरम्यान , परंतु मागील काही दिवसांपासून अजित पवार यांचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना बारामतीतून लढण्याचे आवाहन करीत होते. आपल्याशिवाय बारामतीला पर्याय नाही. आपण बारामतीमधून माघार घेतली तर राज्यभरातही वेगळा मेसेज जाऊ शकतो. त्यामुळे आपल्या निर्णयावर पुर्नविचार करावा, अशी मागणी कार्यकर्ते पदाधिकारी करीत होते. दरम्यान ,  कार्यकर्त्यांच्या आग्रही मागणीचा विचार करून तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशवजा सूचनेपुढे अजित पवार यांनी नमते घेतले असून बारामतीतून निवडणूक लढण्यासाठी होकार दिल्याची माहिती एका वृत्तवाहिनीला मिळाली आहे.  

बारामती विधानसभा मतदारसंघात ३८६ बुथ आहेत. ११७ गावांचा दौरा मी नुकताच पूर्ण केला असून त्यातील जवळपास सर्वच गावांची अजित पवार हेच विधानसभेचे उमेदवार असावेत, अशी इच्छा असल्याचे विधानसभा बुथप्रमुख किरण गुजर यांनी सांगितले. तसेच मतदारसंघातील जवळपास १ लाख लोकांच्या सह्यांचे निवेदन अजित पवार यांना दिले. आपण बारामतीकरांचे एवढ्या वर्ष प्रतिनिधित्व केले. आता तुम्हाला परस्पर निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला ही निवडणूक बारामतीमधूनच लढवावी लागेल, असा जनतेचा आग्रह असल्याचे किरण गुजर यांनी सांगितले.




इतर बातम्या
Join Whatsapp Group