बापरे ! तो दात काढायला गेला अन हार्ट अटॅक ने मृत्यू झाला
बापरे ! तो दात काढायला गेला अन हार्ट अटॅक ने मृत्यू झाला
img
दैनिक भ्रमर

दात काढल्याने हार्ट अटॅक  येऊन मृत्यू झाल्याची अजब घटना घडली आहे . एक व्यक्ती दात दुखत असल्याने उपचार कारण्यासाठी डेंटिस्टकडे गेला. मात्र  हा उपचार त्याचसाठी जीवघेणा ठरला. त्याचे दात दुखत होते. त्यामुळे तो डेंटिस्टकडे उपचारासाठी गेला होता. डेंटिस्टने एकाच दिवसात त्याचे 23 दात काढून टाकले. कहर असा, की वेदनेने तडफडत असलेल्या या माणसाचे 12 नवीन दात त्याने पुन्हा बसवले.

यानंतरही त्या माणसाचा त्रास कमी झाला नाही. वेदना कमी व्हायच्या गोळ्या, इंजेक्शन आणि इतर अनेक औषधं दिली; पण या माणसाचं दुखणं थांबलं नाही. सलग 13 दिवस त्याला त्रास होत होता. इतके दिवस जीवघेण्या वेदना सहन केल्यानंतर भीती आणि धक्क्याने त्याला हार्ट अटॅक आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान , या मृत व्यक्तीच्या मुलीने नुकतीच सोशल मीडियावर ही घटना कथन केली. त्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला. आता स्थानिक मेडिकल असोसिएशन आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान , ही घटना चीनच्या योंगकांग शहरात घडली आहे. सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झाली, त्यानंतर योंगकांग कॉर्पोरेशन हेल्थ ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी पीडिताची मुलगी आणि डॉक्टरांचे जबाब नोंदवले असून, या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group