ऐन गणेशोत्सवाच्या काळात विसर्जनाच्या वेळी दुर्घटना घडल्याचा अनेक घटना ऐकायला मिळाल्या. दरम्यान, अशीच एक दुर्दैवी घटना गणपती विसर्जना दरम्यान घडली आहे . विसर्जना साठी गेलेल्या १० जणांचा बुडून मृत्यू झाल्याची मोठी दुर्घटना घडली गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये घडली आहे , जिल्ह्यातील दहेगाम तालुक्यात गणेश विसर्जनाच्या वेळी १० जणांचा बुडून मृत्यू झाला. आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही घटना दहेगाम वसना सोगाठी गावात घडली.
दरम्यान , मिळालेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जनासाठी लोक गेले होते. भाविकांपैकी 10 जण चेक डॅममध्ये बुडाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली. आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पाच जणांचा शोध सुरू आहे. अशीच एक घटना दोन दिवसांपूर्वी राज्यातील पाटण जिल्ह्यात उघडकीस आली होती. गणेश विसर्जनाच्या वेळी बुडून चौघांचा मृत्यू झाला.
तसेच, याआधी पाटण शहरातील सरस्वती बॅरेजवर गणेश विसर्जनासाठी आलेले पाटण येथील वेराई चकला परिसरातील रहिवासी असलेल्या प्रजापती कुटुंबातील सात जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नयन रमेशभाई प्रजापती, नयन रमेशभाई प्रजापती, जितीन नितीनभाई प्रजापती आणि दक्ष नितीनभाई प्रजापती अशी मृतांची नावे आहेत.