सातपुरला शेत तळ्यात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
सातपुरला शेत तळ्यात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- सातपूर परिसरातील भोर मळ्यात असलेल्या शेत तळ्यात बुडून 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी 3-3.30 वाजेच्या सुमारास विराजनगर मधील 3 अल्पवयीन मुले भोर मळ्यात असलेल्या शेत तळ्यात आंघोळ करण्यासाठी आले होते. त्यात 2 जणांचा पाय घसरून ते तळ्यात पडले.

या घटनेमुळे घाबरलेल्या मुलाने घरी धाव घेऊन या घटनेची माहिती दिली. शेततळ्याबाहेर मुलांचे कपडे पडलेले होते. शेततळ्यात बुडालेल्या मुलांमध्ये आठ आणि १२ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.

घटनेची माहिती माजी नगरसेवक सचिन भोर यांना समजताच त्यांनी त्वरित याबाबत अग्निशमन दलाला कळविले. मुलांचा शोध घेण्यासाठी सिडको अग्निशमन दलाचे जवान गेले होते. मुलांना वाचविण्यासाठी त्यांनी तातडीने जेसीबी बोलावून शेततळे फोडले.

साधारण 7.30 वाजेच्या सुमारास दोघांचे मृतदेह त्यांना मिळाले. मृत मुलांची नावे समजली नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group