नाशिक :- नाशिकचे तापमान कमी झाल्यानंतर नागरिकांच्या वतीने शहरातील प्रसिद्ध असलेल्या चांदीच्या गणपतीला स्वेटर घातले आहे. स्वेटर घातलेला चांदीचा गणपती बघण्यासाठी म्हणून नागरिकांनी दर्शनाबरोबरच या ठिकाणी गर्दी देखील केली आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मागील दोन दिवसापासून तापमानामध्ये घट झालेली आहे त्यामुळे हुडहुडी वाढली आहे. शेकोट्या पेटविल्या जात आहेत.
असे असताना नाशिक शहर हे एका बाजूला जसे वाईन, कांदा द्राक्ष व औद्योगिक नगरी म्हणून जसे ओळखले जाते तसे नाशिकची पौराणिक ओळख ही धार्मिक आहे. या धार्मिक नगरीमध्ये प्रसिद्ध असलेल्या रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीला नागरिकांनी स्वेटर दिले असून हे स्वेटर थंडी वाढल्यामुळे आज सकाळी घालण्यात आले हे स्वेटर गणपतीला थंडी वाजू नये म्हणून घातले गेल्याचे येथील पुजाऱ्यांनी सांगितले आहे.
शहरात प्रथमच चांदीच्या गणपतीला या थंडीमध्ये स्वेटर घातले गेले आहे. नागरिक या ठिकाणी दर्शनाला येताना स्वेटर घातलेला चांदीचा गणपती बघण्यासाठी गर्दी देखील करीत आहे.