कसबे सुकेने परिसरात सातत्याने बिबटे आढळत असून बिबट्यांची मोठी दहशत या शिवारात आहे. दरम्यान नागरिकांच्या मागणीनुसार निफाड वन विभागाने येवला विभागाचे वनसंरक्षण निलेश आखाडे , सहाय्यक वनसंरक्षक सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भगवान जाधव आणि आधुनिक बचाव पथक यांनी सुकेने परिसरात ठिकठिकाणी पिंजरे लावले आहे.
दरम्यान आज पहाटे चार वाजेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात भक्षाच्या शोधात असलेला मादी बिबट्या जेरबंद झाला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, मात्र असे असले तरी या मादी बिबट्याचे पिल्ले या परिसरात असण्याची शक्यता शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे .